Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

दैनिक दखनी स्वराज्य

अल्पावधीतच मराठीत प्रसिद्ध होणारे दैनिक दखनी स्वराज्य हे लोकप्रिय वृत्तपत्र बनले आहे. संपादक, मालक, प्रकाशक संतोष श्रीमंतराव तांबे हे औरंगाबाद जिल्ह्यातून सदर दैनिक (रविवार ते शुक्रवार) प्रसिद्ध करतात. राज्यातील विविध तालुक्यात वार्ताहारांचे मोठे जाळे आहे. दखनी स्वराज्य या नावाने युट्युब चे चैनल देखील चालवले जाते. फेसबुक, इन्स्टा आदी सामाजिक माध्यमातून जनतेपर्यंत जाण्याचा प्रयत्न होतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि गरजवंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे आमचे उद्देश आहेत. अनेक सामाजिक उपक्रम दैनिक दखनी स्वराज्य परिवाराच्यावतीने आयोजित केले जातात. इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांसाठी पुरस्कार देणे, इंग्रजी आणि मराठी माध्यमाच्या शिक्षकांना पुरस्कार देणे, विविध शालेय स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, वैविध्यपूर्ण विषयावर चर्चा घडवून आणणे, साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देणे आदी कार्य केले जाते. दैनिक दखनी स्वराज्याच्या वार्षिक सभासदांना आकर्षक पुरस्कारही दिली जातात. शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, वित्तीय (बँक, नागरी, पतसंस्था, अर्बन निधी, मल्टीस्टेट) संस्था, ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपालिका महानगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, शासकीय आश्रम शाळा, तंत्र शिक्षण शाळा, अध्यापक विद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, कृषी महाविद्यालये आदींचे वार्तांकन केले जाते. अध्यात्म, आरोग्य, शासकीय सेवा, महिला मंडळे, युवक मंडळे, ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आदींसाठी कार्य केले जाते. कुच्चर ओटा, अमृतानुभव, नव्या पिढीला जाणून घेताना अशा महत्त्वाच्या मालिकांच्या माध्यमातून जनहिताची कार्य केली जातात.

नोंदणीकृत कार्यालय : २००/२ , आयकॉन ,शहागड रोड, पैठण, छत्रपती संभाजीनगर ४३११०७

Postal Registration Number - ABD/RNP/535/2024-2026

मुख्य संपादक


team

श्री. संतोष श्रीमंतराव तांबे

संस्थापक आणि संपादक - दखनी स्वराज्य