संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
कन्नड, (प्रतिनिधी )
श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, कन्नड संस्थेचे माजी अध्यक्ष लोकनेते सहकारमहर्षी बाळासाहेब पवार (आप्पासाहेब) यांच्या २६व्या पुण्यतिथीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी फार्मसी महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर मंगळवारी उत्साहात पार पडले.
सकाळी 10.30 वाजता प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत शिबिराचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांपासून ते शिक्षक, पालक तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचा लाभ घेतला.
शिबिरात ब्लड शुगर, रक्तदाब, वजन बॉडी मास इंडेक्स, रक्तगट, हिमोग्लोबिन तपासणी तसेच इतर प्राथमिक . तपासण्या करताना नागरिकांना त्यांच्या आरोग्याविषयी आवश्यक मार्गदर्शनही देण्यात आले. फार्मसी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी सर्व तपासण्या करून आरोग्यसंबंधी जागरूकता, आहार व जीवनशैलीविषयक महत्त्वपूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव मा. श्री चंद्रकांत अण्णा देशमुख, डॉ. भीमराव आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. ए.के. महाले, कृष्ष्णाभाऊ पाटील निकम, प्राचार्य डॉ. भोसले, प्राचार्य डॉ . राहुल क्षीरसागर व संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
लोकनेते बाळासाहेब पवार यांच्या समाजाभिमुख कार्याला अभिवादन म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही हा आरोग्य उपक्रम राबवण्यात आला असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिबिर यशस्वी करण्यासाठी मदत करणाऱ्या डॉक्टर, विद्यार्थी, अध्यापक, कर्मचारी तसेच उपस्थित राहणाऱ्या सर्व नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले.