संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
गैरव्यवहार प्रकरणी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करा - अ.भा.मराठा महासंघाची मागणी
दखनी स्वराज्य, वार्ताहर अक्षय दहिफळे
आपेगाव : अखिल भारतीय मराठा महासंघटनेकडे शेतकरी बांधवांनी कार्यालयातील संबंधित सहाय्यक अभियंता यांनी केलेल्या गैरकारभारांची रीतसर लेखी स्वरूपात तक्रार केली असून त्या अनुषंगाने प्राप्त माहितीनुसार कक्ष कार्यालय आपेगाव येथील सहाय्यक अभियंता हे अत्यंत मनमानी पद्धतीने वागतात शेतकरी व ग्राहकांची पिळवणूक करतात व नवगाव साठी 02/05/2022 रोजी बंच केबल आला होता तो 22/02/2024 पर्यंत नवगाव मध्ये पडून होता. त्या नंतर तो सोयीस्कर रित्या तिथून गायब झाला आहे. तरी सहाय्यक अभियंता यांच्या कार्यभारांची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी तसेच त्यांनी आजपर्यंत एकाही रोहीत्राचे ग्राहक मेंटेनेस केले नाही त्यांनी कागदोपत्री ज्या रोहित्राचे ग्राहक मेंटेनन्स केले असं दाखवले आहे त्या सर्व रोहित्र वरील शेतकऱ्यांची विचारपूस करून संबंधित अधिकाऱ्यावर आठ दिवसात कारवाई करावी नसता अखिल भारतीय मराठा महासंघ व शेतकरी आपल्या कार्यासमोर निदर्शन उपोषण करणार आहे असे निवेदनात म्हटले आहे. अ.भा. मराठा महासंघाचे केंद्रीय कार्यकारणी चिटणीस अतिष भाऊ गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले असून यावेळी उपस्थित युवक तालुका अध्यक्ष विशाल काळे, शहर संघटक ईश्वर जाधव, सोशल मीडिया सोशल मीडिया तालुकाध्यक्ष योगेश म्हात्रे, राजू नाना निवारे, संभाजी झांजुर्णे, अशोक गाडे,प्रदीप गावडे, नारायण झांजुर्णे, पांडुरंग जाधव, गणेश गायकवाड, अनिल जाधव, लक्ष्मण कुलाडे, ज्ञानेश्वर कोल्हे, गणेश जाधव, अशोक गाडे, अनिल निवारे, गणेश गिरगे, गोविंद बावणे आदींची उपस्थिती होती.