संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
ब्रम्हणगव्हान सिंचन योजने मधुन केलेली पाईपलाईन काढली
पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल
दै.दखनी स्वराज्य / वार्ताहर सुरेश गोर्डे
बालानगर : येथील अल्पभुधारक शेतकऱ्याने शेती सिंचन करण्यासाठी ब्रम्हणगव्हान सिंचन योजना ववा येथुन पाईपलाईन केली. सदर पाईप लाईन वैभव नामदेव कातडे यांच्या गट न. 367 /2 मधुन गेली आहे. त्यांनी जे.सी.बी.च्या सहाय्याने ती पाईप लाईन फोडुन वर काढली आहे. यामुळे पाईप लाईन केलेल्या शेतकऱ्याने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून पैशाची मागणी केली आहे. सदर शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे. येथील शेतकरी कृष्णा संतराम गोर्डे, लक्ष्मण श्रीमंत गोर्डे, पाडुरंग भागचंद वीर, महेश भाऊसाहेब वीर यांनी सबंधी वैभव कातडे या शेतकऱ्यावर पैठण एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल केला आहे. येथील सहाय्य पोलीस निरीक्षक ईश्वर जगदाळे साहेब यांच्या मार्फत बीट जमादार दिनेश दाभाडे, गोपाल धारे हे पुढील तपास करत आहेत.