संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
दिव्या वाघचौरे हिने प्रतिकूल परिस्थितीवर मात
करत यश मिळवून माझ्यासह माझ्या मतदार संघची मान उंचावली - आ.बंब...
दै.दखनी स्वराज/ रमेश नेटके
गंगापूर : वाचाल तर वाचाल, असे थोर विचार थोर महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांगून गेले. याचीच प्रचिती माळीवाडगाव येथील विद्यार्थ्यांनी कुमारी दिव्या वाघचौरे हिने दाखवून दिले. गरीब, कष्टाळू, शेतकरी आई-वडिल असलेल्या या मुलीने कुठल्याही शिकवणीशिवाय केवळ मेहनतीच्या जोरावर घरीच अभ्यास करून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत घवघवीत यश मिळवून माझ्यासह माझ्या मतदार संघची मान उंचावली असल्याचे आमदार बंब म्हणाले.
लासुर स्टेशन जिल्हा परिषद सर्कल मधील 11 गावांमधील वृद्ध भाविकांचा 11 वा जत्था कृषी उत्पन्न बाजार समिती समोरील गीताबन येथून आमदार बंब यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या प्रमुख उपस्थिती रवाना करण्यात आला त्यावेळी दिव्या व तिच्या पालकांचा शुक्रवारी ( दि. 14)सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
माळीवाडगाव ता. गंगापूर येथील गरीब, कष्टाळू, शेतकरी आई-वडिलांच्या मुलीने कुठल्याही शिकवणीशिवाय केवळ घरी अभ्यास करून अनेक अडचणींचा सामना करत नुकत्याच झालेल्या MBBS वैदयकीय शिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या NEET - CET च्या परीक्षेत 720 गुणांपैकी तब्बल 679 गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
कुमारी दिव्या विजय वाघचौरे असे तीचे नाव आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यशस्वी झालेल्या दिव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कुमारी दिव्या ही माळीवाडगाव येथील प. बा. पाटील हायस्कूलचा विद्यार्थी आहे.
दिव्याचे प्राथमिक व हायस्कूल शिक्षण गावातीलच जिल्हा परिषदे व नूतन कन्या विद्यालयात पूर्ण झाले. मनात जिद्द असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे दिव्याने दाखवून दिले.
आई-वडील शेतकरी, आर्थिक परिस्थिती बेताची हे चित्र डोळ्यासमोर ठेवून तब्बल दहा - दहा तास अभ्यास करून तीने हे यश मिळवले.
भविष्यात डॉक्टर होऊन आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्याचा तीचे मनोदय आहे.
या निमित्ताने आमदार बंब यांनी तालुक्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान यावेळी डॉ. बन्सीलाल बंब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शेषरावनाना जाधव, बाजार समिती सदस्य सुरेश जाधव, संतोष जाधव, सुनील पाखरे, प्रदीप भुजबळ, महेंद्र पांडे, भाजप तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, युवा जिल्हा अध्यक्ष अमोल जाधव, संतोष काळे, आदींसह ग्राम पंचायत सरपंच, सदस्य कार्यकर्ते परिसरातील भाविक उपस्थित होते