Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

श्रीमती धन्नाबाई दिपचंद गंगवाल तांत्रिक प्रशाला व ज्युनिअर कॉलेज कचनेर येथे विद्यार्थी प्रवेश सोहळा उत्साहात साजरा

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

श्रीमती धन्नाबाई दिपचंद गंगवाल तांत्रिक प्रशाला व ज्युनिअर कॉलेज कचनेर येथे विद्यार्थी प्रवेश सोहळा उत्साहात साजरा


दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था पैठण


कचनेर : दि.15जुन 2024 रोजी

श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र कचनेरजी ट्रस्ट संचालित श्रीमती धन्नाबाई दिपचंद गंगवाल तांत्रिक प्रशाला व ज्युनिअर कॉलेज कचनेर ता व जि.छत्रपती संभाजीनगर येथे

प्राचार्य श्री किरण मास्ट सर यांच्या प्रमुख ऊपस्थीतीत व भजपा जिल्हापदाधिकारी श्री.गजानंद बोहरा यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी प्रवेश सोहळा उत्साहाने साजरा करण्यात आला. व या निमित्ताने नवीन विद्यार्थ्यांचे गजानंद बोहरा, कीरण मास्ट सर व ईतर पाहुन्यांच्याहस्ते पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आणी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी प्राचार्य श्री.कीरण मास्ट सरांनी शाळे विषयी माहीती सांगीतली अणी अध्यक्ष तसेच उपस्थितांचे शाळेच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत केले. तसेच श्री.गजानंद बोहरा यांनी श्रीमती धन्नाबाई दिपचंद गंगवाल तांत्रिक प्रशालेत या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी

नवीन प्रवेश घेतले त्याचे स्वागत केले आणी बोहरा यांनी सर्व विद्यार्थ्यांना खुप खुप अभ्यास करा आणी खुप मोठे व्हा, जिवनामधे खुप प्रगती करा आणी आपल्या शाळेचे व आपल्या आई वडीलांचे नाव मोठे करा असे सांगीतले. आणी गजानंद बोहरा यांनी या वर्षी इयत्ता दहावीचे निकाल 99% लागले आहे त्यासाठी या शाळेतील संपूर्ण शिक्षकांचे आणी मुख्याध्यापक मा.श्री. कीरण मास्ट सरांचे भरभरुन कौतुक केले. व संपूर्ण स्टाफला विनंती केली की, असेच चांगल्या दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत रहा आणी विद्यार्थ्यांचे भविष्य घडवत रहा असे सांगीतले. व कचनेर आणी परीसरातल्या गावातील म्हणजेच या पंचक्रोषितील सर्व पालकांना गजानंद बोहरा यांनी आवाहन केले की आपल्या मुलांचे श्रीमती धन्नाबाई दिपचंद गंगवाल तांत्रिक प्रशालेत खूप मोठ्या संख्येने एडमीशन घ्यावे. आणी आपल्या मुलांचे भविष्य उज्जवल करावे.

यावेळी प्रशालेचे प्राचार्य मा.श्री किरण मास्ट सर , श्री गजानंद बोहरा (या शाळेचा माजी विद्यार्थी व समाजसेवक) तसेच श्री विजयकुमार गोसावी सर (कलाशिक्षक), सुनील कासलीवाल सर, संजय उपाध्ये सर, अरविंद खुळे सर, संतोष कुरकुटे सर, संजय राऊत सर, प्रशांत अन्नदाते सर, श्रीमती प्रतिक्षा उपाध्ये मॅडम, सोहन पाटोदी सर, रमेश जुनवणे सर,संदिप पाटोदी सर, जिवनदास संघवे सर, राजु पाटणी, प्रेमचंद आगरकर, निलेश चुडीवाल व शिक्षक आणी शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि पालक वृंद उपस्थित होते.