संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
नवनिर्वाचित खा. डॉ.कल्याण काळे यांचा जाहीर सत्कार समारंभ
दखनी स्वराज्य, नरेश सिकची
पैठण : जालना लोकसभेतील काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार डॉ.कल्याण काळे साहेब यांचा जाहीर सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. पैठण तालुक्यातील मतदारांनी डॉ.काळे यांना प्रचंड मताधिक्य दिले असल्याने पैठणकर उत्साही असल्याचे दिसत आहेत. त्यासाठी खासदारांचा नागरी सत्कार करण्यात येत आहे.
या कार्यक्रमास काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी राज्यमंत्री अनिल पटेल, माजी आमदार संजय भाऊ वाघचौरे, शिवसेना उप जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ गोर्डे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. 16/06/2024, सायंकाळी 05.30 वाजता आशीर्वाद मंगल कार्यालय उद्यान रोड, पैठण येथे हा समारंभ पार पडणार आहे.
तरी महाविकास आघाडीचे सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सत्कार समारंभ कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विनोद पा.तांबे
(तालुकाध्यक्ष काँग्रेस पैठण),
मनोज पा.पेरे (तालुका प्रमुख शिवसेना, पैठण), डॉ. गुलदाद पठाण (तालुकाध्यक्ष रा.कॉ.पा.,पैठण), निमेश पटेल (शहराध्यक्ष काँग्रेस, पैठण), अजय परळकर
(शहरप्रमुख शिवसेना, पैठण), उमेश पंडूरे
(शहराध्यक्ष रा.कॉ.पा.,पैठण), युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, एन.एस.यु.आय. अनुसूचित जाती जमाती विभाग, काँग्रेस सेवादल, अल्पसंख्यांक विभाग, असंघटित कामगार काँग्रेस, किसान काँग्रेस, ओबीसी सेल, इंटक काँग्रेस, सोशल मीडिया काँग्रेस पैठण यांनी केले आहे.