संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
नाटकरवाडी : नवप्रवेशित विद्यार्थ्यांचे बैलगाडीद्वारे मिरवणूकीने स्वागत
(दखनी स्वराज्य, अक्षय दहिफळे)
चांगतपुरी : दि. 15 जून 2024 रोजी उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी प्रवेश पात्र असलेल्या 9 विद्यार्थ्यांचे गावातून बैलगाडीतून फेरी काढून व औक्षण करून उत्साहात मिरवणुकीने स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष एकनाथ नाटकर तसेच इतर मान्यवर, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोर नाटकर, उपाध्यक्ष सौ. रेणुका नाटकर, शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्षा सौ राणी शिंदे, चांगदेव नाटकर, परशुराम नाटकर, अशोक नाटकर हे उपस्थित होते.
मोफत पाठ्यपुस्तक योजनेअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले. तसेच दादेगाव जुने शाळेचे सहशिक्षक उमेश सोनवणे यांच्या सहकार्यातून शिक्षण आधार फाउंडेशन या सेवाभावी संस्थेकडून शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना वही व पेन्सिल वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमासाठी अर्जुन गुंजाळ, महादेव गुंजाळ, राजेंद्र नाटकर, बळीराम नाटकर, ज्ञानेश्वर नाटकर, मुक्ता नाटकर, सविता नाटकर, रुपाली नाटकर, आत्माराम नाटकर, दशरथ नाटकर आदिं मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण अंधारे तसेच आभार शाळेचे मुख्याध्यापक भागवत फुंदे यांनी मानले.