संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
स्वामी ब्रह्मानंद विद्यालय, पिंपरी राजा येथे विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव साजरा
दखनी स्वराज्य, संदीप शिंदे
पिंपरी राजा : दिनांक 15 जून, 2024 रोजी स्वामी ब्रह्मानंद विद्यालयात विद्यार्थ्यांचा शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव तसेच नविन विद्यार्थीचे स्वागत शासन आदेशानुसार मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या संचालिका तथा धर्मवीर संभाजी माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्षा मालती ताई करंदीकर ह्या होत्या तर अध्यक्ष माध्यमिक विभागाचे मुख्यध्यापक दिनेश देशपांडे हे होते. विद्यालयाचे अध्यक्ष दादासाहेब पाटील घोरपडे, प्रकाश पवार, सुनील झांजरी, अजयसिंह चव्हाण, विक्रम पवार, अंकुश नरोडे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक साखरे, कुबेर, थोरे, सोनवणे, बोंगाणे, श्रीमती रामोळे, सोनाली मॅडम, संगणक विभागाच्या प्रमुख गिरी मॅडम व अन्य मान्यवर होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वितरण करण्यात आले. उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्प व मिठाई देऊन शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागत करण्यात आले.