Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

प्रवेशोत्सवाने साजरा झाला जिल्ह्यात शाळेचा पहिला दिवस

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

प्रवेशोत्सवाने साजरा झाला जिल्ह्यात शाळेचा पहिला दिवस


गाडीवाट येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव


दखनी स्वराज्य, लक्ष्मण शेलार

छत्रपती संभाजीनगर, दि.15 - जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव - 2024 साजरा करून विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यक्रम गाडीवाट येथील शाळेत साजरा करण्यात आला.


शैक्षणिक वर्ष 2024 राज्यातील शाळा आजपासून सुरू झाल्या त्यानिमित्ताने छत्रपती संभाजी नगर तालुक्यातील आदर्श प्राथमिक शाळा गाडीवाट येथे आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव - 2024 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी बांधकाम सभापती विलास भुमरे उपस्थित होते.


शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारावर कमान बसविण्यात आली होती. सर्व वर्ग खोल्यांना सजावट व परिसर सुशोभीकरण करण्यात आला होता. त्यामुळे संपूर्ण वातावरण प्रसन्नदायी होते विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता. इयत्ता 1ली वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची सजवलेल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली.


नव्याने बांधण्यात आलेल्या 9 वी वर्गाच्या खोलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.शाळेतील जापनीज भाषा बोलणाऱ्या 240 विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले. शाळा व शाळेचा परिसर पाहून समाधान व्यक्त करीत या उपक्रमात सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थ व सहाय्यकारी संस्थेचेही कौतुक केले.


शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण,उपशिक्षणाधिकारी

गीता तांदळे, शिक्षण विस्तार अधिकारी संगीता सावळे,

प्रकल्प नियोजन अधिकारी सोज्वल जैन, पंचायत समितीचे माजी सभापती बाबासाहेब राठोड, सरपंच

ज्ञानेश्वर भालके, उपसरपंच

अनिल शिंदे, शाळेतील शिक्षक, पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.