संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
श्री व्यंकटेश पब्लिक स्कूलमधे नवागतांचे सवाद्य स्वागत
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : दि. 15/06/2024 रोजी श्री तिरुपती शिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर संचलित श्री व्यंकटेश पब्लिक स्कूल, भारतमातानगर नाईकनगर बीड बायपास येथे नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन ढोल ताशाच्या गजरात सवाद्य स्वागत करण्यात आले.
या प्रसंगी शाळेचे अनुभवी व जेष्ठ शिक्षक संभाजी भोसले यांनी संस्थेच्या वतीने श्री तिरुपती शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा आदरणीय श्री बप्पासाहेब जाधव पाटील, कोषाध्यक्ष श्री दादासाहेब पाटील, संस्थाध्यक्ष आदरणीय श्री किरण पाटील साहेब यांचे स्वागत केले.मान्यवरांच्या हस्ते नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांना आणि गतवर्षीच्या सर्व विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व मार्गदर्शन मिळाले. त्यानंतर सचिन घुले यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षक या सर्वांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. सर्व विद्यार्थ्यांना फुल दिले. फर्स्ट डे वेलकम सेल्फी काढण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक यांनी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी श्रीमती पुष्पा पवार, श्रीमती गुंठे, श्रीमती राठोड, श्रीमती कुर्हे, विजया दारूंटे, श्रीमती त्रिभुवन, श्रीमती देशमुख, जानकीराम मनगटे, हिरासिंग पडवाल, श्री खैरे, श्री जुमडे, श्री धनवे, श्री देशमुख, शाळेचे कर्मचारी श्री बोडखे, राजु बारसे आणि मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी उपस्थित होते. शाळेचा पहिला दिवस अतिशय उत्साहाने साजरा केला.