संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
आई वडील मुलांना उत्तम संस्कार देतात तर शिक्षक मुलांचे आयुष्य घडवतात - प्राचार्य श्री संदीप काळे
(दखनी स्वराज्य, पैठण) : आज 5 सप्टेंबर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त नर्मदा कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय जायकवाडी उत्तर ता. पैठण येथे शिक्षक दिन उत्सहात साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकाची भूमिका निभावली व शिक्षक कसा असतो याचा उत्तम असा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला महाविद्यालयाच्या प्राचार्य पदापासून तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बनून कनिष्ठ महाविद्यालय उत्कृष्ट चालवले. त्यानंतर जयंतीच्या कार्यक्रमाला डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विद्यार्थी शिक्षक यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप काळे यांनी सांगितले की, शिक्षक समाजला वळण लावण्याचे काम करतात. ते आपले मार्गदर्शक असतात. शिक्षकांचे स्थान आई-वडिलांप्रमाणे असते. आई-वडील मुलांना उत्तम संस्कार देतात तर शिक्षक मुलाचे आयुष्य घडवतात. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. चेतन गर्जे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आयोजन प्रा. चंद्रशेखर साळवे, प्रा. मनीषा पाचारणे, प्रा. स्वाती धुमाळ यांनी केले तर आभार प्रा. साईनाथ भिसे यांनी केले. कार्यक्रमास प्रा. उद्धव ताठे, श्री अजय सातपुते व श्री उमेश जाधव उपस्थित होते.