संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
दखनी स्वराज्य, पैठण (प्रतिनिधी):- भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर, पैठण येथील चि.सोहम नितीन देशपांडे व चि. समर्थ गणेश फटांगडे यांनी नवोदय परीक्षेत यश संपादन केले आहे.
१८ जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय परीक्षेमध्ये औरंगाबाद जिल्हा शहरीभागातून पैठण,वैजापूर, कन्नड, सिल्लोड, गंगापूर ,वैजापूर, खुलताबाद, फुलंब्री,सोयगाव या तालुक्याच्या शहरीभागातून ९ विद्यार्थी निवड झाली आहे तसेच १ विद्यार्थी प्रतिक्षा यादीतील असून एकूण २ विद्यार्थी आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिरातील असून त्यामध्ये प्रतीक्षा यादीतील चि.सोहम नितीन देशपांडे व नुकताच लागलेल्या निकालातील चि. समर्थ गणेश फटांगडे यांची निवड जवाहर नवोदय केंद्रीय विद्यालय, कन्नड येथे झाली आहे. विशेष म्हणजे विविध स्पर्धा परीक्षा ऑलिम्पियाड, शिष्यवृत्ती परीक्षेत देखील घवघवीत यश संपादन यापूर्वी दोघांनी मिळविले आहे.
या यशाबद्दल चि.सोहम व चि. समर्थ पालकांचे अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.