संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठण मध्ये द्वितीय सत्रातील पहिल्या आणि या शैक्षणिक वर्षातील चौथ्या पालक सभेचे आयोजन दिनांक 11- 12- 2024 रोजी विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक प्रा. संतोष पा. तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. प्रा.संतोष पा. तांबे, पालक प्रतिनिधी अनिता घोडके, राम कोळकर, मुख्याध्यापक आर.बी. रामावत यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आठवीचे विद्यार्थी व त्यांच्या मार्गदर्शिका मनवा गोसावी यांनी स्वागतगीत गाऊन पालक सभेची सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर.बी. रामावत यांनी केले. प्रथम सत्र परीक्षेतील प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांचा पालकांसह शैक्षणिक साहित्य देऊन गौरव करण्यात आला. 'आयकॉन ऑफ दी मंथ' म्हणून आठवीच्या वर्गातून वेदांत राऊत, आदित्य शिंदे, नववीच्या वर्गातून अदिती चव्हाण, दहावीच्या वर्गातून गौरव शेळके, अकरावीच्या वर्गातून देवयानी नरके तर बारावीच्या वर्गातून वैष्णवी येवले या विद्यार्थ्यांचा पालकांसह शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला. तसेच प्रा. संतोष पा. तांबे यांची मराठवाडा साहित्य परिषदेवर संचालकपदी बहुमताने निवड झाल्याबद्दल पालकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. पलकासभेतील विषय पत्रिकेच्या अनुषंगाने प्रास्ताविकातून प्राचार्य आर.बी. रामावत यांनी अपार आयडीचे महत्त्व सांगत सर्व पालकांनी विद्यार्थ्यांच्या अपार आयडी काढण्यासाठी सहकार्य करावे, तसेच शैक्षणिक सत्र 2024 -25 मधील शैक्षणिक सहलीच्या आयोजना बाबत चर्चा करत स्थळ आणि शैक्षणिक सहलीचा खर्च यावर पालक संमती घेतली. शिवाय विद्यार्थी गुणवत्ता विकास वाढीच्या अनुषंगाने माहिती दिली. विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष व मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक प्रा. संतोष पा. तांबे यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनातील खेळाविषयीचे महत्त्व समजून सांगत गुणवत्ता विकास वाढीच्या दृष्टिकोनातून पालक - शिक्षक - विद्यार्थी संवादाचे महत्त्व सांगितले. राम कोळकर, दीपक वाकडे, गणेश औताडे या पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. मनवा गोसावी यांनी संगीत व गायना विषयी मार्गदर्शन केले. यावेळी पालक मोठ्या संख्येने सभेसाठी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. धनश्री लाहोटी व कु. अक्षदा दातीर या विद्यार्थिनींनी केले तर डॉ. जालिंदर येवले यांनी आभार व्यक्त केले. पालक सभा यशस्वी करण्यासाठी पी. बी. पातकळ, सौ.एस. एस. धोकटे, बी. आर. पठाण, एस .सी. औरंगे, राहुल बोरकर, ऋषिकेश नवथर, कैलास देशमुख आदींनी प्रयत्न केले.