संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
अंबड शहरात शारदा नगर भागात ही दुर्दैवी घटना घडली, जिथे 11 वी वर्गात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीने छेडछाडीला कंटाळून आत्महत्या केली. सकाळी 9 वाजता घरात गळफास घेऊन तिने आपलं जीवन संपवलं. या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत असून संतापाची लाट उसळली आहे. छेडछाड करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाईची मागणी शहरवासीयांकडून जोर धरत आहे. मुलीच्या आत्महत्येच्या निषेधार्थ, उद्या दि. 11 डिसेंबर रोजी अंबड बाजारपेठ बंदची हाक देण्यात आली आहे. अनेक सामाजिक संघटना आणि नागरीकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे आणि मुलीला त्रास देणाऱ्या आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी पोलीसानी तात्काळ तपास करून आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.