संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
आदिशक्ती पतसंस्थेतर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
दखनी स्वराज्य / नरेश सिकची
आदिशक्ती महिला नागरी सहकारी पतसंस्था व डॉ.सुभाष घाटकर (संचालक आरोग्य व उद्योग विभाग ) यांच्या संयुक्त विद्यमाने संत ज्ञानेश्वर विद्यालय आपेगाव येथील ज्ञानेश्वर माऊली मंदिरात राहणाऱ्या गरजू व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आदिशक्ती पतसंस्थेचे प्रा. विश्वास गव्हाणे, प्रा.अमोल म्हस्के, युवराज औटे, संचालिका प्रा.जयश्री गायकवाड, प्रा.नुतन जोनवाल, मुख्याध्यापक कल्याण म्हस्के, सहशिक्षक सतीश आंधळे, काकासाहेब लिपाने, कांतीलाल नवथर, पोकळे सर, दीपक लसगरे, डी.के. सोनवणे, के.वाय.आहेर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी प्रा.अमोल म्हस्के यांनी, आपण समाजाचे काही देणे लागत असल्याने अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम पतसंस्थेतर्फे दरवर्षी राबविणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गंगाधर शिंदे यांनी केले तर विवेक भोसले यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राध्यापक युवराज औटे, प्रा.सी.पी. राजपूत यांनी प्रयत्न केले.