Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

अखिल भारतीय छावाचा मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

आण्णासाहेब जावळे पाटील यांचे राज्यातील सर्व शिलेदारासह अ.भा.छावा संघटना मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत - प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील


छावाच्या शिष्टमंडळाने घेतली जरांगे पाटील यांची भेट


दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर -


नुकतीच काही माध्यमावर बातमी आली होती की अ.भा.छावा संघटना भाजपा सोबत हा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न प्रविण दरेकर यांनी करण्याचा प्रयत्न केला,परंतु अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना ही मराठ्यांचे क्रांतीसूर्य आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या प्रचंड त्यागाने व बलीदानाने उभी राहिलेली मराठा समाजाची ज्वलंत चळवळ आहे.

हि अशी कोणासोबत जाणार नाही,या प्रसंगी सर्व पदाधीकाऱ्यांसह दि.27 जुलै रोजी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांना विश्वास दिला की,मराठा आरक्षणाच्या लढ्यात अ.भा.छावा संघटना पहिल्या दिवसांपासून सोबत आहे व शेवटच्या दिवसापर्यंत आपल्या सोबत असेल.तसेच याप्रसंगी मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांचे क्रांतीसुर्य वंदनीय आण्णासाहेब जावळे पाटील यांचे ज्वलंत विचार गावखेड्याचा कार्यकर्ता त्याच ताकदीने तेवत ठेवतोय याचा माझ्या सारख्या कार्यकर्त्याला प्रचंड अभिमान आहे,तसेच आण्णासाहेबांच्या त्यागाबाबत बोलताना जरांगे पाटील भाऊक झाले व त्यांचा त्याग व बलीदान आपण विसरणार नसल्याचेही आवर्जून सांगितले.जरांगे पाटलांनी सांगितले की कोण कुठं जातय यांच्याशी मला काही देणं - घेणं नाही,परंतु आण्णासाहेबांचा विचार सुरु ठेवायचा म्हणुन आपण राज्यभरातुन येवढ्या संख्येने आलात याचा मला आनंद आहे.मी आण्णासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्या प्रत्येक छाव्यांसोबत आहे असा विश्वास जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यसह मराठवाडा विभागीय पदाधीकारी सर्व जिल्हाप्रमुख व पदाधीकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.