संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
अण्णा भाऊ साठे या प्रकाशमान युगपुरुषाचे सामाजिक - वाङ्मयीन कर्तृत्व पुढच्या पिढयांना ऊर्जा व दिशा देणारे आहे - विलास सिंदगीकर
दखनी स्वराज्य, जळकोट / दि . १ ऑगष्ट २०२४ _ साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे २० व्या शतकातील एक सामर्थ्यशाली आणि प्रतिभासंपन्न लेखक आहेत.१ ऑगष्ट १९२० ला वाटेगाव जि. सांगली येथे जन्मलेल्या अण्णा भाऊ साठे यांना अवघे ४९ वर्षाचे आयुष्य लाभलेले असले, तरी कथा, कादंबरी, नाटकं, लोकनाटय, पोवाडा, छक्कड, कविता आदी विविध वाङमय प्रकार हाताळून गावकुसाबाहेरील समाजाला नायक बनवले. अण्णा भाऊ साठे यांनी लाभलेल्या आयुष्यात सत्यशोधकी, आंबेडकरी आणि मार्क्सवादी विचार प्रेरणेतून वास्तवादी जीवनावर लेखन केले आहे. उपेक्षित आणि प्रस्थापितांचा जीवनसंघर्ष हा त्यांच्या लेखनीचा केंद्र बिंदू होता . स्वातंत्र्य संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत अण्णा भाऊ साठे यांचे योगदान मोठे आहे . अण्णा भाऊ साठे या प्रकाशमान युगपुरुषाचे सामाजिक आणि वाङ्मयीन कर्तृत्व पुढच्या पिढयांना ऊर्जा आणि दिशा देणारे आहे " असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबईचे सदस्य मा श्री. विलास सिंदगीकर यांनी केले.
जळकोट तालुक्यातील केकत सिंदगी येथील क्रांती माध्यमिक विद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात आज दि . १ ऑगष्ट २०२४ रोजी गुरुवारी सकाळी ठीक ९ .०० वा . साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची १०४ वी जयती मोठ्या उत्सहात साजरी करण्यात आली . यावेळी पत्रकार कैलास पाटील ,शाहीर अंकुश सिंदगीकर ,ए.जी. काळे आणि डी.बी मरशिवणे, आणि श्री .बी . शिंदे आदी . मान्यवर उपस्थित होते . कवी विलास सिंदगीकर पुढे बोलताना म्हणाले की, " अण्णाभाऊ साठे च्या कादंबरीने मराठी साहित्यात नवीन आयाम निर्माण केले . शोषित, पीडित आणि वंचित अशा सामान्य माणसाला अण्णा भाऊंनी कथा - कादंबरीचा नायक बनविले . त्याला समाज व्यवस्थेच्या केंद्रस्थानी आणले . अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य केवळ वाचनियच नव्हे ,तर सामाजिक परिवर्तनाच ध्यास घेणारे असे आहे . जग बदलण्याची ताकद लेखनीत आहे . बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वारसदार लोखक आहे ." शाहीर अकुश सिंदगीकर यांनी अण्णाभाऊ साठेयांच्या जीवनावरील बहारदार पहाडी आवाजात गीत सादर केले ,तर कैलास पाटील यांनी त्यांच्या जीवन चरित्रावर भाष्य केले . यावेळी विद्यार्थ्यांनीही भाषणात भाग घेतला . यात मानसी बामणे या विद्यार्थीनीने सर्वोत्कृष्ट येण्याचा मान पटकावला .
तत्पूर्वी शाळेत अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमाचे सूञ संचालन व प्रास्ताविक कैलास पाटील यांनी केले, तर आभार देवीदास मरशिवणे यांनी मानले . या कार्यकमाच्या यशस्वीतेसाठी जगन्नाथ दळवे रमेश केंद्रे आणि केशव दळवे यांनी परिश्रम घेतले . या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते .