संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
"अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वास्तववादी असून रत्नांची खाण आहे." - अय्युब पठाण लोहगावकर.
दखनी स्वराज्य, पैठण :- शाहू विद्यालय जायकवाडी (उत्तर) ता. पैठण येथे आयोजित लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द साहित्यिक तथा बाल कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांनी मुलांना मार्गदर्शन करतांनी सांगितले की, "अण्णाभाऊ साठे हे फक्त दिड दिवसाची शाळा शिकलेले असून त्यांनी पस्तीस कथा-कादंबरीचे लेखन केले असून ते साहित्य समाजातील प्रत्येक लोकांच्या ऱ्हदयाला जाऊन भिडले आहे." या प्रसंगी श्री. अय्युब पठाण लोहगावकर यांनी अण्णाभाऊ साठे यांची प्रसिध्द छ्क्कड, "माझी मैना गावावर राहीली, माझ्या जीवाची होतीया काहीली." ही छ्क्कड मधूर आवाजात साभिनय सादर करून उपस्थितीत सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी मुख्याध्यापक शंकरराव वाघमोडे व विद्यालयातील सर्व शिक्षक-शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच परिसरातील पालक आणि विद्यालयातील विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.