संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
आंतरभारतीच्या वतीने पैठणला कविसंमेलन
दखनी स्वराज्य, वृत्तसंस्था पैठण :
सोनवाडी ता. पैठण येथे आंतरभारती औरंगाबाद शाखेतर्फे रविवार दिनांक 23/06/2024 रोजी, दुपारी दोन वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कविसंमेलनाला सर्वांनी उपस्थित रहात काव्यानंद घ्यावा अशी विनंती संयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे.
मराठवाडा साहित्य परिषद छत्रपती संभाजीनगरचे कार्यवाह आणि जेष्ठ साहित्यिक, समीक्षक डॉ.दादा गोरे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या संमेलनाच्या प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक सौ.रसिका देशमुख आणि दैनिक दखनी स्वराज्य या वृत्तपत्राचे संपादक, ग्रामीण कथाकार संतोष तांबे हे असणार आहेत.
पैठण तालुक्यातील सोनवाडी येथील डॉक्टर चाकूरकर यांचे फार्म हाऊसवर दुपारी 2 ते 5 या वेळेत हे कवी संमेलन संपन्न होईल. तरी श्रोते आणि साहित्यिकांनी यात सहभागी व्हावे अशी विनंती आंतरभारती शाखा छत्रपती संभाजी नगरचे अध्यक्ष ॲड. श्रीकिशन शिंदे, प्रतिभा शर्मा, उपाध्यक्ष श्री डॅनियल, सचिव डॉ. अलका वालचाळे, कोषाध्यक्ष उज्ज्वला जाधव यांनी केले आहे.