संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
औट्रम घाटातील बोगद्याचे काम तात्काळ सुरु करा
संघर्ष समीतीचे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर साखळी उपोषण
संघर्ष समीतीच्या आंदोलनास शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंचा पाठिंबा
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर : धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील औट्रम ( कन्नड-चाळीसगाव) घाटातील बोगद्याचे काम तात्काळ सुरु करावे, गौताळा अभयारण्यास व्याघ्र प्रकल्प मंजूर करावा तसेच नियोजित गुजरदारी धरणास मंजुरी द्यावी या मागण्यांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर संघर्ष समितीच्या वतिने साखळी उपोषण सुरु करण्यात आले. या उपोषणास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळेस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे रविंद्र इंगळे, संघर्ष समीतीचे डॉ. अण्णासाहेब शिंदे, सरपंच अशोक दाबके, डॉ. सदाशिव पाटील, प्रकाश आबा पाटील, गोकुळ गोरे, राजु राठोड यांच्यासह मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते.
उपोषण स्थळी भेट दिल्यानंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी खासदार असतांना केलेल्या प्रयत्न व पाठपुरावा लक्षात आणून दिला. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी रविंद्र इंगळे उपोषण स्थळी बोलवून या विषयावर तोडगा काढण्याबाबत सांगितले. दरम्यान नागरिकांनी यावेळेस सांगितले की, महामार्ग रस्ता ओलांडत असतांना शेकडो लोकांचे अपघात होऊन अनेकजण मृत्यू तर गंभीर जखमी झालेले आहेत. घाटातील रस्तामुळे ट्राफिक जाममुळे रहदारीस उशीर लागतो. तसेच गौताळा अभयारण्यात व्याघ्र प्रकल्प मंजूर करणे, गुजरदरी धरणास मंजुरी देण्यात यावी अशी मागणी यावेळेस करण्यात आली.
यावेळी अशोक कुमावत, जगन्नाथ खोसरे, शोभा खोसरे, शाम बिरखाने, अंकुश जाधव, शेख रब्बानी, अब्दूल वहाब, बंटी सातदिवे, किशोर पाटील, रामभाऊ शिंदे, ज्ञानेश्वर वेताळ, संजय राठोड, मंगेश गुळवे, नंदु बोडखे, राजु पवार, आर. एस. पवार, सलमान शेख यांच्यासह मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते.