संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
आयकॉन पॅराडाईज मध्ये डॉ. साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी
दखनी स्वराज्य, पैठण - विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठण मध्ये दिनांक एक ऑगस्ट गुरुवार रोजी लोकशाहीर साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य आर. बी. रामावत, प्रमुख पाहुणे विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संतोष पाटील तांबे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एम. के. कोळगे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रस्ताविक अभिजीत निंबाळकर यांनी केले. कार्यक्रमाच्या औचित्य साधून शैक्षणिक वर्ष 2023- 24 मधील ऑलिम्पियाड परीक्षेत दुसऱ्या लेवल मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या अनन्या नागरे, स्वामिनी बोंबले या विद्यार्थिनीचा प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वामिनी थोरे, प्रणवी खोंडवे, आर्या नवथर, या विद्यार्थिनी लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले. प्राचार्य आर. बी. रामावत यांनी अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांचा जीवनपट अनेक उदाहरणे देत विद्यार्थ्यांसमोर मांडला. याप्रसंगी पी.बी. पातकळ, डॉ. जालिंदर येवले, एस. सी. औरंगे, बी.आर. पठाण, सारिका धोकटे, सोनाली गोरे, माधवी कोष्टी, कविता दसपुते, लता पवार, प्रियंका डोके, पूजा देशमुख, रुचिका कुलकर्णी, तब्बसूम पठाण, भाग्यरथा देशमुख, वैशाली शेळके, आशा अवधूत, हर्षदा मुळे, अशोक चव्हाण, नितीन कटारे, ऋषिकेश नवथर, कैलास देशमुख आदींची उपस्थिती होती.