संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
आयकॉन पॅराडाईज मध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा
(दखनी स्वराज्य, पैठण)
विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज पैठण मध्ये (5 सप्टेंबर) डॉ.राधाकृष्णन सर्वपल्ली यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य आर. बी. रामावत यांनी भूषवले तर प्रमुख पाहुणे म्हणून विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष शीलाताई तांबे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एम. के. कोळगे, विद्यार्थी मुख्याध्यापक प्रथमेश लाड, विद्यार्थी मुख्याध्यापिका अदिती काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. राधाकृष्णन सर्वपल्ली, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता सहावीच्या विद्यार्थिनी पूर्वा शेळके, अर्णवी बुधणार, श्रुती धुडियार, जोया शेख, दिशा कबाडी, प्रियल पाटील, हर्षदा चौधरी या विद्यार्थिनी स्वागत गीत सादर केले. बारावीच्या विद्यार्थ्यांनी कॉलेज लाईफ ड्रामा सादर करत सर्व विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. अक्षरा कोळकर, गौरी औताडे, मोदाणी, आर्या लाड, सायली लाड, तन्मय वाघ, अनिकेत येवले, गौरव शेळके, प्रथमेश लाड आदी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सर्व शिक्षकांचे पुष्पगुच्छ व पाण्याची बॉटल देऊन शिक्षक दिनानिमित्त शिक्षक बनलेल्या विद्यार्थ्यांनी स्वागत केले. यावेळी पी.बी. पातकळ, डॉ. जालिंदर येवले, एस. सी. औरंगे, सौ.एस. एस. धोकटे, बी.आर. पठाण, सोनाली गोरे, कविता दसपुते, लता पवार, प्रियंका डोके, पूजा देशमुख, रुचिका कुलकर्णी, तब्बसूम पठाण, भाग्यरथा देशमुख, वैशाली शेळके, आशा अवधूत, हर्षदा मुळे, अशोक चव्हाण, नितीन कटारे, अभिजीत निंबाळकर, ऋषिकेश नवथर, कैलास देशमुख आदींची उपस्थिती होती.