संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
आयकॉन पॅराडाईज मध्ये व्याख्याते विशाल पुरी यांचे व्याख्यान संपन्न
दखनी स्वराज्य, पैठण -
विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचालित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पैठण मध्ये शनिवार दप्तर मुक्त शाळा व महावाचन उत्सवानिमित्त प्रसिद्ध वक्ते विशाल पुरी यांच्या व्याख्यानचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य आर.बी. रामावत यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी संस्थाध्यक्ष प्रा. संतोष पा. तांबे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका एम. के. कोळगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.संतोष पा. तांबे यांच्या हस्ते विशाल पुरी यांचा सत्कार करण्यात आला. विशाल पुरी यांनी विद्यार्थ्यांशी व्याख्यानाच्या माध्यमातून संवाद साधत जीवनात शिस्तीचे महत्व सांगितले. आई, वडील आणि विद्यार्थ्यांमध्ये संवादाचे महत्त्व सांगत मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम सांगितले. त्याचबरोबर विद्यार्थी जीवनात वाचनाचे महत्त्व सांगत शालेय अभ्यासक्रमा बरोबर इतर पुस्तकाचे वाचन करणे विद्यार्थ्यांनी गरजेचे आहे. हे विविध उदाहरणे देत विद्यार्थ्यांना समजून सांगितले. वाचनाशिवाय जीवनाला अर्थ नाही असे सांगत आईवर कविता सादर करत सर्व विद्यार्थ्यांचे मने जिंकली. याप्रसंगी विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पी.बी.पातकळ, डॉ. जालिंदर येवले, एस. सी. औरंगे, सौ.एस. एस. धोकटे, बी.आर. पठाण, सोनाली गोरे, माधवी कोष्टी, कविता दसपुते, लता पवार, प्रियंका डोके, पूजा देशमुख, रुचिका कुलकर्णी, तब्बसूम पठाण, भाग्यरथा देशमुख, वैशाली शेळके, आशा अवधूत, हर्षदा मुळे, अशोक चव्हाण, नितीन कटारे, अभिजीत निंबाळकर, ऋषिकेश नवथर, कैलास देशमुख आदींनी प्रयत्न केले.