संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
खुलताबाद - बांगलादेशातील हिंसाचारात त्या देशातील अल्प संख्यांक हिंदुवरील अत्याचार केले जात असुन, त्या विरोधात सकल हिंदु समाजातर्फे मंगळवारी (ता.10) आंदोलन करण्यात आले.
खुलताबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासुन सकल हिंदु समाजातर्फे संत महंताच्या उपस्थितीत तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या ठिकाणी बांगलादेशातील हिंदुवरील अत्याचाराबाबत तेथील शासनकर्त्यांनी कठोर कारवाई करावी, तेथील हिंदुंना सुरक्षता पुरवावी या मागणीचे निवेदन तहसीलदार स्वरुप कंकाळ यांना निवेदन देताना अभयानंदगिरीजी महाराज कैलास आश्रम वेरूळ , सद्गुरू आक्काताई महाराज नाथ आश्रम वेरूळ, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, शहराध्यक्ष परसराम बारगळ, गणेश अधाने ,दिनेश अंभोरे, सुरेश मरकड,सतिश दांडेकर, योगेश बारगळ,यांच्या हस्ते व सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आले.बांगलादेशातील हिंदू विरुद्ध अत्याचार मोदी सरकारने रोखावेत, सकल हिंदू समाजाची मागणी निवेदनात म्हटले आहे.