संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
पुणे येथील भिमनगर रहिवासी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या माध्यमातून भिमनगरवतीने भव्य आंदोलन जाहिर निषेध करण्यासाठी बहु संख्येने कार्यकर्ते व भिमनगर रहिवासी उपस्थित होते
मा. हिमालीताई नवनाथ कांबळे माजी नगरसेविका यांच्या नेतृत्वाखाली या भव्य आंदोलन जाहिर निषेध करण्यासाठी जनसमुदाय लोटला होता पुणे शहर आर पी अध्यक्ष शहर शैलैश चव्हाण पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस महिपाल वाघमारे ज्येष्ठ कार्यकर्ते शामभाऊ गायकवाड संजय भिमाले बाळासाहेब धिवार बाळा भिसे रेखा साळवे सुमित माने आकाश लोखंडे बापू कापसे चंद्रकांत रिपिके लता कांबळे आप्पा थोरात रोहन जनाबापू पुणेकर बापू लोंढे संतोष धावाडे प्रशांत मोरे अनिकेत गायकवाड प्रकाश रोकडे दीपक पाडाळे विक्रम कापसे राजू साळवे सरवदे नितीन थोरात राहुल बांबोळे नंदू नाईकनवरे विलास चोपडे अमर आठवले रोशन टेकाळे रणजित जोगदंड इतर अनेक प्रामुख्याने कार्यकर्ते उपस्थित होते .
भव्य आंदोलन जाहिर निषेध हे संविधानिक पध्दतीने होते घोषणा देत निषेधार्थ आंदोलन प्रमुख मागण्या मान्य करण्यासाठी शिर्के कंपनीच्या गेटवर जावून मा. हिरेमठ साहेब व मा . देसाई साहेब यांच्या कडे जाहीर निवेदन देण्यात आले
प्रमुख मागण्याची लवकरच पुर्तता करु असे आश्वासन त्यांनी दिले असून त्यांचा पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही दिली
संवेदनशील पणे सहनशीलता जपत भीमनगर मधील नागरिकांच्या मागण्या मुख्य रस्त्याचे रुंदीकरण थांबले पाहिजे शिर्के कंपनी मार्फत बेकायदेशीर मार्गाने कालवा बुजविण्याचे काम त्वरित बंद झाले पाहिजे विकासकाने एस आर ए योजने अंतर्गत गोरं गरिब दलितांची फसवणूक करून त्यांच्यावर अन्याय अत्याचार केल्याने त्यांच्या फसवणूक व ॲट्रासिटी प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे विकासक यांने नागरिकांची सहमती घेवून ज्या कागदपत्रांच्या आधारे भाडे करार नामा करून चेक दिला आहे व त्यांच्या घराचा ताबा घेतला आहे व त्यांना अपील मध्ये टाकले आहे अशा सर्व नागरिकांना घर मिळालेच पाहिजे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत
मान्यवरांची मनोगत व्यक्त झाली अन् भव्य आंदोलन व जाहीर निषेधाची सांगता झाली