संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
(दखनी स्वराज्य, उदगीर) : आपल्याच गावातील लोकांकडून आपला सत्कार होणे हे लाखमोलाचे आहे. यातून केवळ सत्कारमूर्तीलाच प्रेरणा मिळत नसून गावातील अनेक विद्यार्थी पालक यांना ही प्रेरणा देणारा हा उपक्रम आहे, असे मत नेवासा येथील न्यायाधीश सुनील भोसले यांनी व्यक्त केले.
उदगीर तालुक्यातील एकुर्का रोड येथील सदभावना प्रतिष्ठान तर्फे रविवारी भूमिपुत्रांचा गुणगौरव सोहळा घेण्यात आला. यावेळी न्यायाधीश सुनील भोसले बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच चंद्रकला ज्ञानोबा कांबळे या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे उमरगाचे डॉ. उदय मोरे, लातूर येथील राजमुद्रा ॲकॅडमीचे संचालक महेश मोरे, आदर्श गाव जकेकुरवाडीचे सरपंच अमर सूर्यवंशी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. दयानंद माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यानंतर गावातील यूपीएससी, एमपीएससी, डॉक्टर, सेट नेट उत्तीर्ण झालेल्या भूमिपुत्रांचा त्यांच्या पालकांसह सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक डॉ. दयानंद माने यांनी केले. सुत्रसंचालन रसूल पठाण यांनी तर उपस्थितांचे आभार प्रा. रविकिरण कांबळे यांनी मानले. कार्यक्रमासाठी गावातील व परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
व्यंकटेश गंगाधर शेवाळे (बी. टेक यूपीएससी, आयएफएस), विकास शिवराज जाधव (एम. एस.सी. एमपीएससी एस.टी.आय.), रोहन देविदास जाधव (बी.ई. मेकॅनिक आरसीएफ), डॉ. व्यंकट प्रल्हादराव पाटील (एम.ई.पीएचडी), डॉ. दयानंद रामराव माने (एम. ए. इंग्लिश पीएचडी),
डॉ. शांतीसागर किशनराव बिरादार एम. ई. पीएचडी), डॉ.विद्यासागर किशनराव बिरादार (एम.एस.सी. ऑग्री, पीएचडी), डॉ. तानाजी कामाजी उदगीरकर (एम.ए. पीएचडी), डॉ. मनीषा प्रकाश भारती (एम.ई. पीएचडी), डॉ. बालाजी मधुकर एकुर्केकर (एम.ए. अर्थशास्त्र, पीएचडी), डॉ. राजेश दत्तात्रय भारती (एम.टेक. पीएचडी), संजय हनुमंतराव ऐलवाड (एम.ए. एम.जे. साहित्यिक), डॉ. हर्षवर्धन विजय पाटील (एम.डी. मेडिशिन), डॉ. रजनी तातेराव कांबळे (बीएमएस पीजी कॉस्मो.),
डॉ. नमिता तातेराव कांबळे (एम.डी.), डॉ. जयदीप सुरेश जाधव (एमडी पर्सुइंग), एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेले ऋषभ संजय जाधव, शोएब मौलासाब पठाण,अखिब मौलासाब पठाण, डॉ. शुभम किशन शेवाळे, श्रीशैलेश किशन शेवाळे, कुणाल सुरेश भारती, कोमल शिवाजी काकडे (बीएमएस), विशाखा गंगाधर शेवाळे-भानवसे (एमएससी मायक्रोटेके, नेट-सेट जीआरएफ, शास्त्रज्ञ), अंजुम रसूल पठाण एमएससी रसायनशास्त्र, सेट), समर्थ विद्यालय (मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान जिल्ह्यात तृतीय), शितल उत्तम जाधव (१२ वी विज्ञान शाखेत प्रथम), रेणुका हनुमंत गादीमोड १२ वी कला शाखेत प्रथम), सरस्वती निळकंठ शेवाळे (१० वी वर्गात प्रथम) यांचे सत्कार करण्यात आले.