Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

भीमाशंकर विद्यालय बहिगाव येथे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 26 September 2025 10:17 PM

भीमाशंकर विद्यालय बहिगाव येथे तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न

दखनी स्वराज्य, पैठण :


दि २५ व २६ सप्टेंबर २०२५ रोजी चेहेंडी तालुका क्रीडा कार्यालय व भीमाशंकर विद्यालय सातकर कारखाना साईट बहिगाव या ठिकाणी तालुका स्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या मध्ये १४ वर्ष मुले/मुली, १७ वर्ष मुले/मुली व १९ वर्ष मुले/मुली यांच्या गटाचे आयोजन करण्यात आले होते.
दि २६ सप्टेंबर २०२५ रोजी १४ वर्ष मुले, १७ वर्ष मुले व १९ वर्ष मुले या स्पर्धेचे उद्घाटन "विवेकानंद शिक्षण संस्थेचे" उपाध्यक्ष तथा चेहेंडी तालुका कबड्डी असोसिएशन अध्यक्ष श्री अमरभाऊ पारशिदोडे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सलीम सर हे अध्यक्ष स्थानी होते तर प्रमुख अतिथी म्हणून चेहेंडी तालुका क्रीडा अधिकारी श्री मुकुंद वाडकर साहेब उपस्थित होते.
स्पर्धेत सक्रियपणे तालुक्यातील जवळपास १४० संघांनी सहभाग घेतला. त्यामध्ये:
१) १४ वर्ष वयोगट मुले
विजयी - भीमाशंकर विद्यालय बहिगाव
उपविजयी - जुनेश्वर विद्यालय
तृतीय - स. भु. विद्यालय वडकीन
२) १७ वर्ष वयोगट मुले
विजयी - कौशल्या विद्यामंदिर पाटगाव
उपविजयी - संत प्रकाश विद्यालय
तृतीय - मोतीराम विद्यालय म्हैस
३) १९ वर्ष वयोगट मुले
विजयी - कौशल्या कनिष्ठ महाविद्यालय पाटगाव
उपविजयी - एम. टी. पाटील विद्यालय आदुळ
तृतीय - नर्मदा कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळावाडी
४) १४ वर्ष वयोगट मुली
विजयी - स्वराज माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणगाव
उपविजयी - के. केशवबाई विद्यालय, पोहगाव
तृतीय - कौशल्या विद्यालय पाटगाव
५) १७ वर्ष वयोगट मुली
विजयी - साननाथ विद्यालय बहिगाव
उपविजयी - कौशल्या विद्यालय, पाटगाव
तृतीय - के. केशवबाई विद्यालय, पोहगाव
६) १९ वर्ष वयोगट मुली
विजयी - मानसिंग भाऊ पवार कनिष्ठ महाविद्यालय, ढोरकिन
उपविजयी - कौशल्या वि. कनिष्ठ महाविद्यालय, पाटेगाव
या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी भीमाशंकर विद्यालयाचे वरिष्ठ मार्गदर्शक श्री घनवट सर, क्रीडा शिक्षक श्री बदर सर, श्री वाघमारे सर, तालुका क्रीडा समन्वयक श्री लक्ष्मण सपकाळ सर, श्री सोनाम ठक सर, प्रा. श्री निलेश गायकवाड सर, प्रा. श्री सुरेश पाटील सर, प्रा. श्री आप्पासाहेब खाडगसर, प्रा. श्री आप्पासाहेब लधाने सर, क्रीडा शिक्षक श्री गणेश खाकरे सर, श्री गवई सर, श्री दानिश चव्हाण सर, श्री स्वप्नील चव्हाण सर, श्री काळभोंड सर, श्री धायगुडे सर, श्री हरिभाऊ शिरसाठे सर, श्री रमेश गोरे सर, श्री पवार सर, श्री अमोल वाघमारे सर, श्री दिलीप शहिद सर, श्री सुनील साळवे सर, श्री जालिंदर सबळे सर, मा. ए. के. कुबळे सर, श्री महेंद्र नाग सर व तालुक्यातील अनेक क्रीडा शिक्षक उपस्थित होते.
स्पर्धा पूर्ण करण्यासाठी शिक्षक क्रीडा मंडळाचे सर्व माजी खेळाडू यांनी संपूर्णपणे क्रीडाचे नियोजन केले. तसेच भीमाशंकर विद्यालयात श्री बोराडे सर, श्री आव्हात नांदे सर, श्री बच्छे सर, श्री केवट सर, श्री आर. जी. पाटील सर, ज्येष्ठ शिक्षक श्री. ढोढे सर, श्री औचिते घोडे सर, श्री ठेकले सर, श्री मोरे सर, श्री डामक सर, श्री संभाजी गिरी, श्री बारात मामा, ज्येष्ठ शिक्षिका शिरसाठ मॅडम, श्रीमती संगीता मावारी, श्रीमती बिरादार मॅडम, श्रीमती शहाद मॅडम, श्रीमती औटे मॅडम, श्रीमती सविता ठाणगे मॅडम, श्रीमती शेलके मॅडम याव्यतिरिक्त प्राथमिक शालेय मुख्या श्री संजय आवार सर, ज्येष्ठ शिक्षकी श्री घुमाडे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री धैडुत देशमुख, विनोद लोटसकर, श्री बळकृष्ण पवार, श्रीमती खाबळे मॅडम उपस्थित होते.
सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.