संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
भारत देश सक्षम होण्यासाठी नारीशक्ती जागृत हवी : डॉ. हेमंत वैद्य
दखनी स्वराज्य / नरेश सिकची, पैठण -
आपले विचार आचार हे आपल्याला घडवत असतात त्यातूनच आपल्या देशाची प्रतिमा उंचावत असते. "भारत देश सक्षम होण्यासाठी नारीशक्ती जागृत हवी असे आवाहन भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईचे कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य यांनी केले.
७८ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य विद्या मंदिर पैठण येथे ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. अध्यक्षस्थानी डॉ. जयंत जोशी हे होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतमाता, सरस्वतीमाता, अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक केंद्रीय कार्यकारिणी सदस्य विजय चाटुपळे यांनी केले.
यावेळी सामाजिक संदेश देणारी नाटिका शिशुवाटिकेच्या मुलांनी सादर केली तर एकात्मता संदेश देणारी नाटिका इयत्ता सहावी सातवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. ॲथलेटिक्स खेळात सहभागी झालेला इयत्ता पहिलीतील चि. महेंद्रसिंग संजय शिवराणा याचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ.पद्मकुमार कासलीवाल, डॉ.राम लोंढे, मनोज शुक्ल, अनिल कावसानकर, रामकृष्ण जमादार, शरद बिडकर, शिवाजी मारवाडी, नंदकिशोर मालाणी, किशोर भाकरे, रवींद्र साळजोशी, विजय पापडीवाल, ॲड. अशोक शेवतेकर, दत्तात्रय पोहेकर, डॉ.सुनील गायकवाड, अशोक पल्लोड, शिवाजी मारवाडी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भास्कर कुलकर्णी, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती जोशी आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास खर्डेकर यांनी तर आभार प्रदर्शन जुगलकिशोर लोहिया यांनी केले.