संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाच्या सचिव वर्षा जोशी यांनी चित्तेपिंपळगाव येथील गोसंवर्धन सहकारी दूध व्यवसायिक संस्थेला रविवारी सकाळी साडेसहा वाजता भेट दिली या भेटीसाठी ते दिल्लीवरून आल्या होत्या, त्यांच्यासोबत भारत सरकारच्या पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभागाचे सहआयुक्त डॉ. भूषण त्यागी, उपआयुक्त श्री. दयानंद सावंत, जिल्हा दूध संघाची एम.डी श्री. पहाडिया साहेब उपस्थित होते. त्यांनी दूध संस्थेचे सर्व माहिती घेतली व दूध संकलनाची पाहणी केली. त्यावेळी उपस्थित दूध उत्पादक शेतकरी व संस्थेच्या संचालक मंडळा सोबत चर्चा केली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्याच्या हस्ते संस्थेच्या वतीने दहा लिटर स्टीलच्या कॅनचे वाटप करण्यात आले.यावेळी त्यांनी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याशी फोनवरून संवाद साधला व संस्थेच्या काम करण्याची पद्धत व कार्याबद्दल आनंद व्यक्त केला, तसेच "कुठलीही मदत लागल्यास आवश्यक सांगा आम्ही मदत करू असा विश्वास दिला". याप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री. दिनकर गावंडे ,संचालक भास्कर काकडे ,छबाबाई पवार, राजू बागडे, भगवान गावंडे अनंता वाघमारे ,नेवास पवार, भाऊसाहेब पवार, एकनाथ गावंडे व दूध उत्पादक शेतकऱ्यांची उपस्थिती होती.