Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

ब्रेल लिपीतील संत एकनाथ महाराजांच्या चरित्राचे पैठण येथे प्रकाशन !

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 22 March 2025 05:55 AM

ब्रेल लिपीतील संत एकनाथ महाराजांच्या चरित्राचे पैठण येथे प्रकाशन ! 

दखनी स्वराज्य, पैठण :

ब्रेल लिपीतील जगातील पहिले संत चरित्र म्हणून संत एकनाथ महाराजांच्या या ब्रेल लिपीतील चरित्राकडे पहावे लागेल असे गौरवोद्गार संत साहित्याचे गाढे अभ्यासक तथा संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी काढले. 
नाथवंशज हभप श्री योगिराज महाराज गोसावी यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबविण्यात आला. पैठणच्या शांतीब्रह्म प्रकाशना तर्फे हे प्रकाशन करण्यात आले. शांतीब्रह्म श्रीएकनाथ महाराज मिशनचे या प्रकल्पास मोठे योगदान लाभले. आमदार विलासबापू भुमरे व आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषारजी भोसले यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.

संत एकनाथ महाराजांच्या जीवनाचा संक्षिप्त आढावा या चरित्रात घेण्यात आला. या प्रसंगी छत्रपती संभाजीनगर येथिल अंध शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी या चरित्राचे वाचन केले. 

याप्रसंगी एकनाथ महाराजांचे शिष्य संतशिरणी श्री नरहरी महाराज यांच्या चरित्र ग्रंथाचे देखील प्रकाशन करण्यात आले. यासाठी चास येथील प्रसाद महाराज देव यांनी याकामी पुढाकार घेतला.