संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
रविवार दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी मातोश्री लॉन्स जालना या ठिकाणी बेस्ट अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी जेईएस कॉलेजचे उपप्राचार्य मा. श्री डॉ. बी वाय कुलकर्णी सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून समाजसेविका सौ. सीमाताई अर्जुनराव खोतकर या होत्या.
राज्यातील अनेक जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पैठण बेस्ट अबॅकस सेंटर मधील विद्यार्थिनी स्वरा ऋषिकेश तांबटकर या विद्यार्थिनीने फक्त नऊ मिनिटात शंभर प्रश्न सोडवून राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत जूनियर लेवल मधून राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला.
त्यानंतर जखमी असतानाही स्पर्धेत सहभागी होऊन विहान संदीप एडके या विद्यार्थ्याने राज्यस्तरीय स्पर्धेत ज्युनिअर लेव्हल मधून द्वितीय क्रमांक पटकावला.
तसेच मागील वर्षी झालेल्या बेस्ट अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेत यशाने हुलकावणी देऊन तृतीय क्रमांक मिळवलेल्या राजवीर दीपक चांडक या विद्यार्थ्याने जिद्द मेहनत आणि चिकाटी याचे प्रदर्शन घडवत यावर्षी बेस्ट अबॅकस राज्यस्तरीय स्पर्धेत यावर्षी अवघ्या 8.50 मिनिटात 100 प्रश्न सोडवून सेकंड लेव्हल मधून राज्यातून प्रथम क्रमांक पटकावून यश खेचून आणले.
तसेच यश अनिकेत वैद्य या विद्यार्थ्याने या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत यशाला गवसणी घातली.
या यशाबद्दल या यशस्वी विद्यार्थ्यांचे बेस्ट बीड अबॅकस संस्थापक अध्यक्षा सौ.अरुणा ठाकूर आणि श्री.अर्जुन ठाकूर यांनी ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव केला. या यशाबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
बेस्ट अबॅकस पैठण सेंटरच्या संचालिका सौ सारिका संतोष तानवडे यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेमध्ये दिग्विजय लोळगे, आदर्श हाडे, आयुष शेळके, दूर्वा दहिवाळ, श्रीराम क्षीरसागर, आरुषी दसपुते, अबोली यादव, आराध्या वाकणकर, भार्गवराम फटांगडे, सारा साळुंखे, शरण्या शिंदे, चैतन्य हिवाळे, रितेश तानवडे, शौर्य दसपुते इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला त्याबद्दल त्यांचेही संस्थेच्या वतीने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला.