Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

चिंचाळा जि.प. शाळेत लागले सि.सि. टिव्ही कॅमेरे

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 08 October 2024 09:42 PM

चिंचाळा जि.प. शाळेत लागले सि.सि. टिव्ही कॅमेरे

 शिक्षक व शालेय समितीचा पुढाकार


दै दखनी स्वराज्य / शब्बीर भाई


  पैठण तालुक्यातील  चिंचाळा येथील जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समिती सदस्य व शाळेतील शिक्षक वृंद यांच्या स्वखर्चातून विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेसाठी शालेय परिसरात CCTV बसवण्यात आले.याबाबतीत शालेय समिती अध्यक्ष सदस्य व शिक्षकांनी स्वखर्चाने पुढाकार घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही बसवून दुसऱ्या शाळेसाठी एक आदर्श निर्माण केला आहे याबद्दल पालक व गावकऱ्यांकडून त्यांचे विशेष कौतुक होत आहे
       याप्रसंगी अध्यक्ष स्वामीनाथ येवले ,उपाध्यक्ष दत्तात्रय बोडखे , भरत बोडखे, बिभीषण बोडखे , वसंत गरड, हरी खैरे,सोनाली संभाजी बोडखे , सपना प्रकाश राजगुरू, पंचगंगा स्वामी खैरे, कविता अंकुश बनसोडे  केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक मधुकर शेळके , संजय गवांदे, काकासाहेब ढिलपे, बाबासाहेब येळे, अमोलराज शेळके , प्रवीण बोडखे , साधना इप्पर, छाया कराड आदि सर्वांचे सहकार्य लाभले…