Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

चंद्रशेखर मलकमपट्टे लिखित 'भूमिपुत्रांचे बाबासाहेब' साहित्यकृतीवर मराठवाडा साहित्य परिषदेत निबंधवाचन

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 25 December 2024 09:30 PM

चंद्रशेखर मलकमपट्टे लिखित 'भूमिपुत्रांचे बाबासाहेब'  साहित्यकृतीवर मराठवाडा साहित्य परिषदेत निबंधवाचन


(दखनी स्वराज्य, नांदेड)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे दलितांचे नेते, अस्पृश्यांचे उद्धारकर्ते, संविधानाचे शिल्पकार, स्त्रियांचे मुक्तिदाते असाच विचार आज पर्यंत साहित्य संमेलने आणि चर्चासत्र यामधून सांगण्यात आला. चंद्रशेखर मलकमपट्टे यांचा 'भूमिपुत्रांचे बाबासाहेब' हा कवितासंग्रह परंपरागत भूमिका घेऊन समोर न येता कष्टकरी, शोषित, सर्वहारा, कामगार, बलुतेदार, अलुतेदार, शेतमजूर अशा सर्व भूमिपुत्रांना कवेत घेणारा आणि त्यांचे सर्व प्रश्न मांडणारा कवितासंग्रह असून या कवितासंग्रहावर दिनांक 28 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. ना.गो. नांदापूरकर सभागृह छत्रपती संभाजीनगर येथे निबंध वाचन व चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
 या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील हे राहणार असून नव्या पिढीतील साक्षेपी विचारवंत तथा  सुप्रसिद्ध समीक्षक डॉ रणधीर शिंदे कोल्हापूर, श्री लक्ष्मण खेडकर पैठण हे निबंध वाचन करणार आहेत. डॉ. भास्कर निर्मळ पाटील व सुनील उबाळे छत्रपती संभाजीनगर हे निबंधावर व कवितासंग्रहावर चर्चा करणार आहेत.
   या कार्यक्रमास साहित्यप्रेमी रसिक  श्रोत्यांनी आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा साहित्य परिषद संभाजीनगरचे उपाध्यक्ष आसाराम लोमटे, रामचंद्र तिरुके, कैलास इंगळे, रामचंद्र काळुंखे, गणेश मोहिते, दीपा क्षीरसागर, संतोष तांबे, डॉ.हंसराज जाधव, कैलास इंगळे, आशा डांगे यांनी केले आहे.