संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
: पुणे जिल्हा रहिवासी उत्कर्ष मंडळ ऐरोली यांच्या वतीने संत सावता माळी सभागृह ऐरोली येथे आयोजित कौटुंबिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे यशाचा पासवर्ड आहे, असे प्रतिपादन व्याख्याते नारायण लांडगे पाटील यांनी केले. ते पुढे म्हणाले की संघर्ष, नियोजन याचे महत्त्व समजून घेण्यासाठी व यशाच्या परमोच्च शिखरावर आपली पताका फडकवण्यासाठी रील हिरो नव्हे तर रियल हिरोचा आदर्श असला पाहिजे. त्यानंतर सदरील कार्यक्रमात महिलांची उखाणे स्पर्धा घेत लकी ड्रॉ पद्धतीने पंधरा पैठणी साडी व तीन सोन्याच्या नथ देऊन महिलांना सन्मानित करण्यात आले. रविंद्र औटी यांनी या कार्यक्रमाचे समन्वय म्हणून भुमिका निभावली याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते निलेश बानखिले, अध्यक्ष कैलास सुकाळे, सचिव रविंद्र औटी सहसचिव, दत्तात्रय नाईकरे यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.