संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
महाराष्ट्र राज्य विज्ञान संस्थेमार्फत ५२वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन २०२४-२५, दि. २७ - २९ डिसेंबर २०२४, छत्रपती शाहु महाराज शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगर येथे राज्य विज्ञान संस्था महाराष्ट्र राज्य व जिल्हा परिषद शिक्षण विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने सी.एस.एम.एस.एस. कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक छत्रपती संभाजीनगर येथे दि. २७ ते २९ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये कुमारी आश्वीनी प्रदिप मोहीते व वेदिका बाळू माोहिते यांनी क्रमांक पटकावला. छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूल धनगाव
या शाळेने शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान (Science and Technology for Sustainable Furure) या विषयावर आधारीत नाविन्यपूर्ण प्रयोग साहित्य प्रदर्शित करून प्रथम क्रमांक घेतल्याबद्दल मा. श्रीमती जयश्री चव्हाण शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर मा. श्रीमती अश्विनी लाठकर शिक्षणाधिकारी माध्यमिक, जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येत आले.
यावेळी छत्रपती शिवाजी पब्लिक स्कूलच्या संचालिका श्रीमती अश्विनी सुदाम पोल्हारे, मुख्याध्यापक उद्धव लघाने यांचाही सत्कार करण्यात आला. प्रयोगाच्या यशस्वीतेसाठी विज्ञान शिक्षिका मेघा चाबुकस्वार, श्री संतोष पोल्हारे, श्री पाईकराव साहेब, श्री दिनेश बानाईत व इतर शिक्षकांनी परीश्रम घेतले.