Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

चिश्तीया महाविद्यालयात स्वतंत्रता दिवस उत्सहात साजरा

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

चिश्तीया महाविद्यालयात स्वतंत्रता दिवस उत्सहात साजरा


दैनिक दखनी स्वराज्य/संदेश केरे, खुलताबाद -


चिश्तीया महाविद्यालयात स्वतंत्रता दिवस कार्यक्रम ऊत्साहात पार पडला.प्राचार्य डाॅ. कादरी सय्यदा अर्शिया यांच्या हस्ते झेंडा वंदन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत डाॅ.एजाज शेख व डाॅ.अफसर शेख होते. प्रमुख वक्ते म्हणून डाॅ.मोहम्मद अली होते.कार्यक्रम अध्यक्षस्थानी प्राचार्य डाॅ.कादरी सय्यदा अर्शिया होते.

सर्व प्रथम विद्यार्थीनिनी स्वागत गीत गायले.कश्यप नाझ हिने भाषण केले तर अनिकेत वरपे याने कविता वाचन केले.यावेळेस प्रमुख वक्ते डाॅ. मोहम्मद अली यांनी व्याख्यान दिले. डाॅ.एजाज शेख यांनीही भाषण केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डाॅ.कादरी सय्यदा अर्शिया यांनी केले. यावेळेस मान्यवरांच्या हस्ते अनेक ऊपक्रमात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डाॅ. मोहम्मद मुजाहेद ऊर रहेमान, डाॅ.शिल्पा देशपांडे व स्वयंसेवकांनी महाविद्यालय परिसरात स्वच्छता अभियान राबविले.

कार्यक्रम सूत्रसंचालन डाॅ.अशोक भालेराव व आभार प्रा.सुनील जाधव यांनी केले. यावेळेस विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.