Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

कॉन्फ्लिक्ट ट्रान्सफॉर्मेशन' कार्यशाळेचे उद्घाटन

ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण
Dakhani Swarajya 15 December 2024 02:02 PM

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि महात्मा गांधी मिशन यांच्यातर्फे आयोजन


पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि महात्मा गांधी मिशन विश्वविद्यालय यांच्यातर्फे आयोजित ‘कॉन्फ्लिक्ट ट्रान्सफॉर्मेशन' विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन शुक्रवार, दि.७ जून रोजी सकाळी करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या विचारांच्या साहाय्याने वैयक्तिक आणि सामाजिक जीवनातील समस्यांना कसे सामोरे जावे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे . पहिल्या दिवशी डॉ. जॉन चेलादुराई (संभाजीनगर) आणि हेदर क्युमिंग (अमेरिका) या अभ्यासकांनी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले .
कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अन्वर राजन, प्रा. डॉ. मच्छिंद्र गोर्डे, जांबुवंत मनोहर, ऋचा देवकर, विवेक काशीकर आदी मान्यवर उपस्थित होते. ८ जून रोजी देखील सकाळी साडे नऊ ते सायंकाळी ५ या वेळेत ही कार्यशाळा गांधीभवन, कोथरूड येथे होणार आहे.