संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सारख्या ग्रामीण व दुर्गम भागातून प्रसिद्ध होणारे, भाषा, साहित्य, कला आणि लोकसंस्कृतीला वाहिलेले त्रैमासिक "तिफण"ने सोळाव्या वर्षात पदार्पण केले आहे. तिफणचे आजपर्यंत अनेक महत्वाचे विशेषांक प्रसिद्ध झालेले आहेत. तिफणच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. दर दोन ते तीन वर्षात तिफण संपादक मंडळाची पुर्नरचना करण्यात येते. आजपर्यंत अनेकांना संपादक मंडळावर संधी मिळाली आहे. २०२५ - २०२७ या दोन वर्षासाठी तिफण संपादक मंडळावर सदस्य म्हणून प्रा. डॉ. मनिषा नेसकर (बेळगाव - कर्नाटक) यांची निवड करण्यात आली आहे. डॉ. मनिषा नेसकर या बेळगाव येथील राणी चेन्नमा विद्यापीठातील मराठी अध्ययन आणि संशोधन विभागात विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर काम केलेले असून मराठी भाषा, साहित्य आणि संशोधन क्षेत्रात त्यांचे महत्वाचे योगदान आहे. मराठी व कन्नड भाषेचा सांस्कृतिक अनुबंध यावर त्यांचे संशोधन आहे.
त्यांच्या निवडीचे पत्र त्रैमासिक तिफणचे संपादक डॉ.शिवाजी हुसे यांनी दिले असून यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.