Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

डॉ. सुधीर रसाळ यांचा मराठवाडा साहित्य परिषदेत जाहीर सत्कार

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 03 January 2025 07:49 PM

डॉ. सुधीर रसाळ यांचा मराठवाडा साहित्य परिषदेत जाहीर सत्कार 

दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :

मराठीतील ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या विंदांचे गद्यरूप (गो. वि. करंदीकरांचे गद्यलेखन) या समीक्षाग्रंथास इ. स. 2024चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराच्या निमित्ताने मराठवाडा साहित्य परिषदेने रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 5:30 वाजता परिषदेच्या डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. हा सत्कार मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते होणार असून सत्कारानिमित्त डॉ. चंद्रकांत पाटील हे भाष्य करणार आहेत. रसिकांनी या सत्काराला उपस्थित राहावे अशी विनंती साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. आसाराम लोमटे, श्री. रामचंद्र तिरुके, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे, सहकार्यवाह डॉ. गणेश मोहिते, डॉ. दीपा क्षीरसागर आणि कार्यकारिणीचे सदस्य कुंडलिक अतकरे यांनी केले आहे.