Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

डॉ. ताहीर पठाण (अलीगढ, उत्तरप्रदेश) यांची तिफण संपादक मंडळावर निवड

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 22 March 2025 05:42 AM

डॉ. ताहीर पठाण (अलीगढ, उत्तरप्रदेश) यांची तिफण संपादक मंडळावर निवड



दखनी स्वराज्य, कन्नड :

कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सारख्या ग्रामीण व दुर्गम भागातून प्रसिद्ध होणारे, भाषा, साहित्य, कला आणि लोकसंस्कृतीला वाहिलेले त्रैमासिक "तिफण"ने सोळाव्या वर्षात पदार्पण केले आहे. तिफणचे आजपर्यंत अनेक महत्वाचे विशेषांक प्रसिद्ध झालेले आहेत. तिफणच्या माध्यमातून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. दर दोन ते तीन वर्षात तिफण संपादक मंडळाची पुर्नरचना करण्यात येते. आजपर्यंत अनेकांना संपादक मंडळावर संधी मिळाली आहे. २०२५ - २०२७ या दोन वर्षासाठी तिफण संपादक मंडळावर सदस्य म्हणून अलिगढ केंद्रिय मुस्लिम विद्यापीठ उत्तरप्रदेश येथील भारतीय भाषा  विभागात, मराठी भाषा विभागप्रमुख, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. ताहेर पठाण यांची त्रैमासिक तिफणच्या संपादक मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश येथे मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती साठी त्यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या निवडीचे पत्र त्रैमासिक तिफणचे संपादक डॉ.शिवाजी हुसे यांनी दिले असून यांचे मनःपूर्वक अभिनंदन होत आहे.