संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
दत्तात्रय निकाळजे यांस सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार प्रदान
(दखनी स्वराज्य, पुणे प्रतिनिधी जगदीप वनशिव)
पुणे- येथील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे यांच्या तर्फे दिला जाणारा या वर्षीचा मानाचा सर्वात्कृष्ट निसर्ग संवर्धन पुरस्कार मा. दत्तात्रय निकाळजे यांस प्रदान करण्यात आला. दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकराव चव्हाण, उपाध्यक्ष सुनिलराव रासने, उत्सव प्रमुख अक्षय प्रतापराव गोडसे, कोषाध्यक्ष महेशभाऊ सूर्यवंशी यांच्या शुभहस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले. पुरस्कारांचे स्वरूप शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि चांदीची ट्रॉफी असते.
सामाजिक बांधिलकी वैचारिक मंथन करत मार्मिक भाष्य करत असणारे निसर्गप्रेमी दत्तात्रय निकाळजे उर्फ आबासाहेब हे झाडे लावा जीव वाचवा नेहमी संदेश देत असतात. झाडांमुळे आरोग्य संपदा जपली जाते असे ते नेहमीच सांगतात. झाडांची नाती जपली तरच माणुसकी जपता येते. आई वडिलांचा आशीर्वाद म्हणजे आजचा मिळालेला पुरस्कार आहे असे ते पुरस्कार स्वीकारताना म्हणाले. त्यांच्या सोबत आई, वडील बापू साहेब निकाळजे, धाकटे बंधू मंगेश निकाळजे आणि मित्र परिवार हजर होता. निवेदक पत्रकार रानकवी जगदीप वनशिव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर हे प्रामुख्याने उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सभामंडपात पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.