Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

डॉ. प्रकाश खेत्री यांना नागरी विकास संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 27 September 2024 12:04 PM

डॉ. प्रकाश खेत्री यांना नागरी विकास संस्थेचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार


(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) : - 5 सप्टेंबर या शिक्षक दिना निमित्त नागरी विकास सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून दिला जाणारा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 डॉ.प्रकाश खेत्री यांना ज्येष्ठ विधीतज्ञ तथा जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. आनंदसिंग बायस यांच्या हस्ते तेजस्विनी इंग्रजी शाळा, पुंडलिकनगर येथे प्रदान करण्यात आला. यावेळी मिलिंद पाटील, धर्मदाय कार्यालय, माजी सैनिक नारायणराव भोसले, डॉ. गिताताई शोभवन, चिमणरराव डुकरे, कार्यक्रमाचे मुख्य संयोजक एल. डी. ताटू, अँड सुभाष कोकुल्डे, भोरासिंग राजपूत, प्रा. गुरूदत्त राजपूत, अंजली कोकुल्डे व प्रा. भिमसिंग काहटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. खेत्री हे डॉ. भीमराव आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, कन्नड येथे समाजशास्त्र विभागात गेल्या 20 वर्षा पासून कार्यरत आहेत. तसेच ते कनिष्ठ महाविद्यालय समाजशास्त्र परिषदेचे राज्याध्यक्ष आहेत. "विकास आणि परिवर्तनाच्या प्रक्रियेत अजिंठा डोंगर परिसरातील भिल्ल जमात " या विषयावर समाजशास्त्र विषयात संशोधन कार्य केले आहे. मासिके व दैनिकातून ते प्रासंगिक, परीक्षणात्मक आणि विश्लेषणात्मक लेख लिहितात. विविध विषयांवर त्यांचे संशोधन पेपर प्रकाशित झाले आहेत, कन्नड आणि परिसरात अनेक विषयावर त्यांनी शेकडो व्याख्याने दिली आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातूनही त्यांनी प्रबोधन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि संशोधन मंडळ,पुणे बालभारती येथे समाजशास्त्र अभ्यास मंडळाचे ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत. या सर्व शैक्षणिक, सामाजिक कार्य आणि योगदानाची दखल घेत. नागरी विकास सेवाभावी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांनी डॉ. प्रकाश खेत्री यांना राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2024 देऊन सन्मान केला आहे.

सन्मान व पुरस्कार मिळालाबद्दल डॉ.भीमराव आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. ए.के. महाले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .विजय भोसले, उपप्राचार्य डॉ.बी.के. मगर उपप्राचार्य प्रा. अभय आहेर आदींनी अभिनंदन केले आहे.