संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
डॉ.सौ. इं.भा. पाठक महिला कला महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
(दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर) - येथील डॉ.सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयात 5 सप्टेंबर 2024 शिक्षक दिन उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनिता बाजपाई या होत्या. यावेळी विद्यार्थी संसद समिती प्रमुख डॉ. मीनाक्षी देव-निमकर, डॉ.रमा दुधमांडे, कनिष्ठ महाविद्यालयातील पर्यवेक्षिका प्रा. माधुरी भावसार यांची उपस्थिती होती. आरंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी वर्गात शिकविण्याचे काम केले तर वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीपीटी द्वारे अध्यापन केले. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. प्रेमला मुखेडकर, प्रा.रवींद्र प्ररभणे, प्रा.मनिषा देशपांडे यांनी काम पाहिले.
कला, वाणिज्य व बीसीए विभागातून उत्कृष्ट शिकविणाऱ्या विद्यार्थिनींचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक कु.आकांक्षा वर्मा (बीसीए तृतीय वर्ष) व कु.नंदिनी सुपेकर (बीसीए तृतीय वर्ष), द्वितीय क्रमांक कु.साक्षी ढवळणपुरे (बीए तृतीय वर्ष) व कु. नयन देशपांडे (बीए द्वितीय वर्ष), तृतीय क्रमांक कु.प्रतिक्षा मनचरे (बीकाॅम द्वितीय वर्ष) व कु.तन्वी ढोणे( बीए तृतीय वर्ष) उत्तेजनार्थ कु.सोनल कोडापे (बीसीए तृतीय वर्ष) तर क्रीडा शिक्षक कु. सिद्धी हंडे यांनी वरिष्ठ महाविद्यालयातून बक्षिसे मिळवली. तर कनिष्ठ महाविद्यालयातील कु.भार्गवी मोदी (12 वी कला) हिने प्रथम क्रमांक, लक्ष्मी ओंकार हिने द्वितीय क्रमांक, कु.अमृता गायके हिने तृतीय क्रमांक आणि कु.श्रृती गुट्टे, कु. राधिका दैठणकर व शेख अश्मिरा (12वी कला) उत्तेजनार्थ क्रमांक मिळविला. यावेळी विद्यार्थिनींनी विविध प्रशासकीय भूमिका निभावल्या, त्यामध्ये प्राचार्य म्हणून कु.भाग्यश्री नंद (बीए तृतीय वर्ष) कार्यालय अधीक्षक (OS) म्हणून कु.साक्षी नागरगोजे, ग्रंथालयात कु.वैष्णवी ठोंबरे, कु.धनश्री पिंपळे, कु.तनुजा पळसकर व क्रीडा शिक्षक म्हणून कु.खुशाली मधेकर, पर्यवेक्षिका म्हणून कु.श्रृती गुट्टे यांनी काम पाहिले.
प्राचार्य म्हणून भूमिका बजावताना आलेले अनुभव भाग्यश्री नंद हिने आपल्या मनोगतातून सांगितले.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. सुनिता बाजपाई यांनी शिक्षकांचे महत्व सांगून, शिक्षणाच्या पवित्र क्षेत्रात ज्ञानदानाचे कार्य करणे हे खूप सन्मानाचे आणि जवाबदारीचे कार्य आहे याची जाणीव त्यांनी सर्वांना करून दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अनुजा काळे हिने अत्यंत ओघवत्या शैलीतून केले तर कु. प्रतिक्षा लिंभारे हिने आभार प्रकटन केले. याप्रसंगी विद्यार्थिनींनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन त्यांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला.