संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयाची कु.संजीवनी जाधव मॅरेथॉन मध्ये प्रथम
दखनी स्वराज्य, छत्रपती संभाजीनगर :
येथील आपत्ती व्यवस्थापन जिल्हाधिकारी कार्यालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात उद्भवणाऱ्या विविध आपत्ती संदर्भात जनजागृती करण्यासाठी दि. 10/08/2024 रोजी मॅरेथॉन कार्यक्रमाचे सकाळी 08.30 वाजता आयोजन करण्यात आले होते. याकरीता गजानन महाराज मंदिर ते विभागीय क्रीडा संकुल असा २ किलोमीटर पर्यंतचा मार्ग निश्चित करण्यात आला होता. या मॅरेथॉन मध्ये डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला कला महाविद्यालयाची कु. संजीवनी जाधव हिने मुलींमधून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
याप्रसंगी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. मीनल श्रीगिरीवार, डॉ. अन्विता अग्रवाल तसेच डॉ. प्रतिभा धोंडकर यांच्यासह वैष्णवी सुभाष ठोंबरे, भाग्यश्री नारायण नंद, तनुजा रवींद्र पळसकर, प्रीती गौतम वाहुळे, पूजा रघुनाथ बागडे, साक्षी रमेश बागडे, कोमल सोनू बागडे, सिद्धी हंडे, खुशी गवळे, आरती ठाकूर, संजीवनी जाधव, रविना साळवे, मधुबाला लोहार, कांचन दानवे या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेविकांनी सहभाग घेतला होता. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. सुनिता बाजपाई यांनी सर्वांचे अभिनंदन केले.