संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
"दुधात नाही पाणी" या गवळनीने दहीहंडीचा कार्यक्रम रंगला
दखनी स्वराज्य, पैठण :- प्रसिद्ध साहित्यिक तथा पाठयपुस्तकातील कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांनी श्रीकृष्ण जन्माष्ठमीला जायकवाडी (उत्तर) ता. पैठण येथील शाहू विद्यालयात आयोजित दहिहंडीच्या कार्यक्रमात "बाजाराला विकण्या निघाली दही-दुध लोणी, बाई माझ्या गं दुधात नाही पाणी" या गवळनीने कार्यक्रमात रंगत आणली. कवी अय्युब पठाण लोहगावकर यांनी आपल्या मधुर आवाजात साभिनय ही गवळ्ण सादर करून दहीहंडीच्या कार्यक्रमात मोठी धमाल केली. या प्रसंगी शाळेतील मुख्याध्यापक शंकरराव वाघमोडे यांच्यासह विद्यालयातील संपूर्ण शिक्षकवृंद, परिसरातील पालकवर्ग व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी दहिहंडी कार्यक्रमाचा आनंद लुटला. शेवटी दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद सर्वांना वाटून कार्यक्रमाची सांगता झाली.