Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

एक्सलंट पब्लिक इंग्लिश स्कूलचा करण चौधरी ९४.८० गुणांनी उत्तीर्ण

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 14 May 2025 07:05 AM

एक्सलंट पब्लिक इंग्लिश स्कूलचा करण चौधरी ९४.८० गुणांनी उत्तीर्ण 

दखनी स्वराज्य वृत्तसेवा :


दखनी स्वराज्य वृत्तसेवा : बिडकिन येथील एक्सलंट पब्लिक इंग्लिश स्कूलचा गुणवंत विद्यार्थी करण नवनाथ चौधरी याने ९४.८० गुणांनी दहावी बोर्ड परीक्षा उत्तीर्ण केली आहे. वडगव्हाण या छोट्याशा गावातील प्रसिद्ध समाजसेवक आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते नवनाथ पाटील चौधरी यांचा मुलगा करण याने ९४.८० टक्के गुण मिळवल्याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. क्रांतिसेनेचे अध्यक्ष प्रा.संतोष तांबे सर, छावा महाराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर पाटील शिरवत, मराठवाडा अध्यक्ष मनोज पाटील मुरदडे, जिल्हाध्यक्ष साईनाथ पा. कर्डिले यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका चव्हान मॅडम, सहशिक्षक अजय सर, प्रतिक्षा ढाकेफळे मॅडम, अडसरे सर, संदिप सर, इलियास सर तसेच इतर सहकारी शिक्षक वृंद यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.