संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
कन्नड: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मध्यवर्ती बस स्थानक कन्नड येथे एस टी भाडेवाढी विरोधात दि. 27 जानेवारी रोजी चक्का जाम आंदोलन करण्यात आले.
उपस्थित उबाठा शिवसैनिकांनी सरकार विरोधात घोषणा देत सरकार चा निषेध केला. महागाई बेरोजगारी, शेतीमालाला मिळणारा कवडीमोल भाव यामुळे सर्वसामान्य होरपळून निघत असताना त्यांना दिलासा देण्या ऐवजी आता एसटी भाड्यात ही वाढ करुण, सरकार जखमेवर मीठ चोळत आहे. त्यामुळे सरकार ने भाडेवाढी चा घेतलेला निर्णय रद्द झालीच पाहिजे. महागाई कमी झालीच पाहिजे आदी भावना व्यक्त करत उबाठा शिवसेना तालुका प्रमुख संजय मोटे यांनी सरकार विरोधात भाषण केले. या आंदोलनात तालुका संघटक डॉ. अण्णासाहेब शिंदे, युवा तालुका अधिकारी योगेश पवार, शेतकरी तालुका संघटक गणेश शिंदे, उप तालुका प्रमुख गीताराम दादा पवार, नवनाथ राठोड, योगेश गवळी, बाबासाहेब मोहिते, विभागप्रमुख कल्याण चव्हाण,
उपविभाग प्रमुख अर्जुन पवार, शाखा प्रमुख गणेश भिंगारे, सदाशिव क्षीरसागर, सुभान शेख, श्री बोरसे आदी सहभागी झाले होते.