Dakhani Swarajya

संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034

Dakhani Swarajya
ताज्या बातम्या पुस्तक परीक्षण लेख

गो. वा. महाविद्यालयाचा रा से.यो. तर्फे अनोखा उपक्रम

ताज्या बातम्या
Dakhani Swarajya 26 September 2025 09:39 PM

गो. वा. महाविद्यालयाचा रा से.यो. तर्फे अनोखा उपक्रम

दखनी स्वराज्य, नागभीड


गो. वा. महाविद्यालय नागभीड, राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिन सप्ताह अंतर्गत "एक पेड माँ के नाम" उपक्रमात वृक्षारोपण व देहदान ...  विषयावर पथ नाट्य                                                               26 सप्टेंबर 2025 रोज शुक्रवार ला राष्ट्रीय सेवा योजना विभाग व नगर परिषद, नागभीडच्या संयुक्त विधमाने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिनाच्या औचित्याने स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत (दिनांक 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर 2025) “एक पेड मा के नाम” उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमा अंतर्गत नागपूर- चंद्रपूर हाय वे च्या मध्ये असलेल्या दुभाजकावर 150 वृक्षांचे रोपण करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे 92 स्वयंसेवक, समन्वयक प्रा.डॉ. चंद्रशेखर हनवंते, कार्यक्रम अधिकारी प्रा. मंगेश देव ढगाले, नगर परिषद मुख्याधिकारी सोनम देशमुख व कर्मचारी उपस्थित होते. वृक्षारोपनाकरिता खड्डे करून त्यामध्ये कम्पोस्ट खत टाकून रोप लावण्यात आले. त्या नंतर सर्व रोपांना पाणी घालण्यात आले. या नंतर प्रा.डॉ. गणेश सांगोळकर लिखित व दिग्दर्शित “देहदान” या विषयावर राम मंदिर चौक,  नागभीड येथे मराठी व रा.से.यो. विभागाच्या संयुक्त विद्यमाने पथ नाट्य सादर करण्यात आले या मध्ये एकूण 17 रा.से.यो स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सिंग याच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.