संपादक : संतोष श्रीमंतराव तांबे | RNI: MHMR/2022/87034
.गणोरी जि प प्रशालेला मिळाले विशेष पोलीस महानिरीक्षकांचे प्रशस्तीपत्र
शाळेच्या स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमाचा स्वातंत्र्यदिनी गौरव =======================
दखनी स्वराज्य, फुलंब्री : महाराष्ट्र पोलीस दलाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्टुडन्ट पोलीस कॅडेट उपक्रमात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद गणोरी प्रशालेचा परिक्षेत्रातून दुसरा आणि जिल्ह्यातून पहिला क्रमांक घोषित झाला आहे. स्वातंत्र्यदिनी ग्रामीण पोलीस मुख्यालयात झालेल्या ध्वजारोहण समारंभा नंतर विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या स्वाक्षरीचे प्रशंसापत्र छत्रपती संभाजीनगर जिह्याचे पोलीस अधीक्षक ग्रामीण मा श्री विनय कुमार राठोड यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक श्री सचिन पंडित, सहायक पोलीस उपनिरीक्षक हबीब अहमद याची उपस्थिती होती. केंद्रीय गृहमंत्र्याच्या अख्यतारीतील पोलीस संशोधन आणि विकास ब्युरो नवी दिल्ली यांच्यावतीने महाराष्ट्र पोलीस दलाच्या मार्फत शासकीय आणि केंद्रीय शाळातील इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टुडन्ट कॅडेट (एसपीसी) हे अभियान चालविले जाते.जिल्हा परिषद गणोरी प्रशाला या उपक्रमाचा घटक आहे. शैक्षणिक वर्ष 22 -23 मध्ये प्रशालेत पोलीस दलाच्या वतीने अंतर्गत आणि बाह्य वर्ग घेण्यात आले. पोलीस ठाण्यांना भेट,पोलिसांच्या कार्य स्थळावर जाऊन वाहतूक नियमांची माहिती करून घेणे.पोलिस कोठडी, शस्त्रगार यांना भेट. श्वान पथकाचे प्रात्यक्षिक यांचे आयोजन करण्यात आले.प्रशालेच्या "वाचाल तर वाचाल विद्यार्थी वाचतानालया"चे समृद्धीकरण अशा बाबी चे प्रशालेने उत्कृष्ट योजल्या.पोलीस दलाच्या आधुनिकणातर्गत शालेय विद्यार्थ्यांमध्ये नीतिमूल्य रुजून जबाबदार नागरिक घडविणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, या उद्देशानुरूप कामकाज केल्याबद्दल हे प्रशस्तीपत्र देण्यात आले आहे. गणोरी प्रशालेच्या वतीने ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती एस.डी. देशमुख, एन एन परदेशी विद्यार्थी कू दक्षिणी चंद्रे, आदित्य शेळके, कू प्रतीक्षा तांदळे ओम रोठे, रोहित उबाळे,आदित्य शेळके यांच्या चमूने हे पारितोषिक छत्रपती संभाजीनगर जिह्याचे पोलीस अधीक्षक ग्रामीण मा श्री विनय कुमार राठोड यांच्या हस्ते सन्मानपूर्वक स्वीकारले.या प्रसंगी सहायक पोलीस निरीक्षक श्री सचिन पंडित, सहायक पोलीस उपनिरीक्षक हबीब अहमद याची उपस्थिती होती.प्रशालेच्या या सन्मानाकरिता गणोरी येथे सरलाताई संतोष पाटील तांदळे, श्री संतोष तांदळे, मुख्याध्यापक अनिल देशमुख,शाळा समितीच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता जाधव यांनी चमुचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन आणि स्वागत केले. प्रशालेच्या या यशाकरिता मुख्याध्यापक अनिल देशमुख याच्यासह श्रीमती सुवर्णा देशमुख ,श्री नगराजसिंह परदेशी,श्रीमती एस डी नाईकवाडे,श्रीमती एस एम बाबरेकर,श्री सुरेश ठाकूर,श्री रामेश्वर जाधव,श्री राजेंद्र जगताप,श्रीमती बी व्ही ठाकरे, श्रीमती एस एस पळशीकर,श्री कुंदन सूर्यवंशी, श्रीमती के एन.सिंघल,श्रीमती ए.एन.नेरपगार,श्रीमती सविता बरसागडे,श्रीमती सुनंदा मिरकर,श्रीमती एस.बी.बडक,श्रीमती आर एस वेळे,श्री सागर भालके,श्री तुषार अंभोरे,रोहिदास म्हस्के यांनी आनंद व्यक्त केला._